नगरपालिका प्रशासन संचालनालय
नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन हा महानगरपालिका, नगरपरिषदा, नगर पंचायतींच्या माध्यमातून शहरी लोकसंख्येच्या गरजा भागवत आहे.
नगरविकास विभाग-2 अंतर्गत कार्यरत असलेले नगरपरिषद प्रशासन संचालनालय, हे महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या समन्वयासाठी राज्यस्तरीय कार्यालय आहे.
महाराष्ट्र राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा इतिहास शतकाहून अधिक काळाचा आहे. लोकसंख्येच्या आधारावर, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे वर्गीकरण विविध श्रेणींमध्ये केले जाते जसे
1. महानगरपालिका ज्यांचे पुढे अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग आणि ड वर्ग महानगरपालिका असे वर्गीकरण केले जाते.
2. नगरपरिषदांचे ज्यांचेपुढे अ वर्ग, ब वर्ग व क वर्ग नगरपरिषदा असे वर्गीकरण करण्यात आले आहे.
3. नगर पंचायती.
नगर परिषदा आणि नगर पंचायती या "महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, 1965" द्वारे शासित आहेत.
महाराष्ट्रात सध्या 416 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्यापैकी 28 महानगरपालिका, 16 अ वर्ग, 75 ब वर्ग नगरपरिषदा, 154 क वर्ग नगरपरिषदा आणि 143 नगर पंचायती आहेत.